मंत्रीपदी निवड झालेल्या अनिल पाटील यांचे अमळनेरकरांनी जल्लोषात केले स्वागत
माजी आमदार साहेबराव पाटील यांच्याकडून पुष्पगुच्छ ऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश !
Amalnerkar welcomed Anil Patil, who was elected as a minister अमळनेर : आमदार अनिल भाईदास पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर शुक्रवारी त्यांचे अमळनेरात आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. दुसरीकडे माजी आमदार साहेबराव पाटील यांच्याकडून पुष्पगुच्छ ऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश देत नेहमी प्रमाणे आपली वेगळी शैली जपली. दरम्यान, मंत्री पाटील यांनी गावाच्या वेशीवर आल्यानंतर भूमीला वंदनही केले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश
माजी आमदार साहेबराव पाटील यांच्याकडून अभिनंदन व वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून फटाक्यांची आतिषबाजी व प्रदूषण न करता अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाकडून मदत कार्यासाठी पुढाकार घेण्यात आला. नैसर्गिक आपत्तीस सामोरे जाण्यासाठी आणि मदत व पुनर्वसनाच्या उद्भवलेल्या नैसर्गिक कामात आपलाही हातभार लागावा म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी माजी आमार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्याकडून पाच हजार रुपयांचा धनादेश अनिल पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी जि.प सदस्या जयश्री पाटील, जिल्हा बँक चेअरमन संजय पवार, माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील, मराठा समाज अध्यक्ष जयवंतराव पाटील, प्रा.अशोक पवार, भागवत सूर्यवंशी, डी.एम. पाटील, श्यामकांत पाटील, अॅड.यज्ञेश्वर पाटील, माजी नगरसेवक निशांत अग्रवाल, राजूभाऊ वाणी, रवी पाटील, प्रभाकर पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
