मन्यारखेडा येथील विवाहितेची आत्महत्या


जळगाव : जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा येथील 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता घडली. ममता शंकर भील (20, रा.मन्यारखेडा, ता.जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, सासरच्या जाच्याला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप मयत विवाहितेच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

गुरुवारी राहत्या घरात आत्महत्या
भुसावळ तालुक्यातील जोगलखोरी येथील माहेर असलेल्या ममता शंकर भील यांचा विवाह जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा येथील शंकर सुरेश भील यांच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला होता. सासरी पती, सासरे, सासू आणि नणंद यांच्यासोबत वास्तव्याला होत्या. गुरूवार, 6 जुलै रोजी घरी कुणीही नसतांना राहत्या घरात विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार सायंकाळी पाच वाजता उघडकीला आला.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. या घटनेबाबत नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !