मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले : मंत्री अनिल पाटील यांनी स्पष्ट शब्दात दिले हे स्पष्टीकरण
जळगाव : राज्यातील शिंदे-भाजपा सरकारला समर्थन दिल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची वर्णी लागली तर राष्ट्रवादीच्या अन्य आठ आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळाली. त्यात अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनाही संधी मिळाली. शुक्रवारी जिल्हा दौर्यावर आलेल्या मंत्री पाटील यांना जळगाव दौर्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतर आपण काळे झेंडे दाखवले होते, असा प्रश्न माध्यमांनी छेडला असता ते म्हणाले की, त्यावेळचे पक्षाचे जे धोरण होते त्यानुसार केले. आता सत्तेत आहे. ग्रामपंचायत निवडणूक ते मंत्रीपद प्रवास केलेला आहे. दोन्ही मंत्र्यांना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रतोद म्हणाले 44 पेक्षा अधिक आमदारांचे समर्थ
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे नेमके किती आमदारांचे संख्याबळ आहे या प्रश्नावर अजित पवार गटाचे प्रतोद आणि कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांनी 44 पेक्षा अधिक आमदार आमच्याकडे असल्याचे सांगत लवकरच राष्ट्रवादीचे सगळेच सोबत येतील, असा दावा केला आहे.

