चोपडा शहरात शिक्षिकेचे धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवले
Teacher’s dhoom style Mangalsutra extended in Chopra city चोपडा : घराकडे पायी निघालेल्या शिक्षिकेच्या गळ्यातील 51 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र धूम स्टाईल आलेल्या चोरट्यांनी लांबवले. ही घटना रामकुंवर नगरातील रस्त्यावर शुक्रवारी रात्री पावणेआठ वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे चोरी प्रकरण
ज्योती चंदन पवार (41, रामकुंवर नगर, चोपडा) या शिक्षिका असून शुक्रवार, 7 रोजी पावणेआठ वाजता घराकडे पायी येत असताना पाठीमागून विना क्रमांकाच्या दुचाकीवरून धूम स्टाईल आलेल्या 20 ते 25 वयोगटातील चोरट्यांनी 17 ग्रॅम वजनाचे व 51 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवले. शिक्षिकेने आरडा-ओरड केली मात्र तो पर्यंत चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी पवार यांच्या तक्रारीवरून चोपडा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक् अजित सावळे करीत आहेत.


