शेती वादातून टाकळीतील शेतकर्याला विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न : त्रिकूटाविरोधात गुन्हा
An attempt to kill a farmer in Takli by administering poison to him due to a farm dispute: Crime against the trio मुक्ताईनगर : शेतीच्या वादातून तालुक्यातील टाकळी येथील 58 वर्षीय शेतकर्याला शेतातील फवारणीचे विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना बुधवार, 28 जून 2023 रोजी सायंकाळी घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गावातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेती वादातून घटना
मोहन कवरसिंग चव्हाण (58, टाकळी, ता.मुक्ताईनगर) हे तक्रारदार शेतकरी असून संशयित आरोपींशी त्यांचा शेती वाद असल्याने बुधवारी सायंकाळी हा वाजेच्या सुमारास धनराज चव्हाण व रंगलाल चव्हाण यांच्या घरी संशयित आरोपी अजमल धनराज चव्हाण, बसराज कवरसिंग चव्हाण व नामदेव रंगलाल चव्हाण (सर्व टाकळी, ता.मुक्ताईनगर) यांनी शेतात फवारणी करण्याचे विषारी औषध त्यांच्या तोंडात टाकून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर शेतकर्यावर उपचार करण्यात आल्यानंतर त्यांनी गुरुवारी मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.
