दहावीतील अल्पवयीन तरुणीची जळगावात सुसाईड नोट लिहित आत्महत्या
A 10th class minor committed suicide by writing a suicide note in Jalgaon जळगाव : धरणगावातील मूळ रहिवासी व शिक्षणानिमित्त जळगावात काकांकडे वास्तव्यास असलेल्या दहावीच्या विद्यार्थिनीने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. कृष्णाप्रिया अरुण पाटील (15) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन तरुणीचे नाव आहे. ही घटना रामानंदनगर पोलीस ठाणे हद्दीतील शास्त्रीनगरातील स्वामी समर्थ केंद्रासमोरील घरात घडली.
घरी कुणी नसताना उचलले पाऊल
सतखेडा (ता. धरणगाव) येथील कृष्णाप्रिया शिक्षणासाठी जळगावला काका-काकूंसोबत मागील वर्षापासून राहत होती. आई-वडील लहान अपंग भाऊ आणि बहिणीसोबत गावी राहतात. शनिवारी ती काका-काकूंसोबत पेरणीसाठी गावी गेली होती मात्र बुधवारी सकाळी ती एकटीच परत जळगावला आली. त्यानंतर तिने आपले जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहिली असून एकटं एकटे वाटते, मी जगून काहीच फायदा नाही. पण मी मरेल, मला माफ करा. मी तुमचे स्वप्न पूर्ण करण्याआधीच मरेल. पण काय करू? माझ्या विचारांचा पूर्णपणे घोळ झाला आहे. मरावे असे काही कारण पण नाही. पण जगून काय मिळेल. सॉरी, पण तुमचे नाव बदनाम होणार नाही. आपल्या घरचं नाव बदनाम होण्याचे कारण पण नाही. अप्पाची ट्रीटमेंट राहून जाईल, अशी चिठ्ठी तरुणीने लिहून ठेवली असून पोलिसांनी ती जप्त केली आहे.


