एरंडोलल शहरात धाडसी घरफोडी : तीन लाखांचे दागिने लंपास !


Daring burglary in Erandolal City : Jewels Worth Three Lakhs Looted एरंडोल : बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री गांधीपुरा भागातील न्यू लक्ष्मी नगरमध्ये उघडकीस आल्याने या भागात घबराट पसरली आहे.

घरफोडीमुळे उडाली खळबळ
ईश्वर पंडित वंजारी हे गांधीपुरा भागातील न्यू लक्ष्मी नगरात राहतात. काही दिवसांपासून ते जळगावात वास्तव्यास आहेत परंतु ते अधून-मधून साफ-सफाई येत असतात. त्यानुसार गुरुवार, 6 रोजी सकाळी ईश्वर वंजारी यांचा मुलगा सौरभ हा एरंडोल येथील घरी आला. घराची सफाई करून कुलूप लाऊन सायंकाळी साडेसहा वाजता तो निघून गेल्यानंतर मध्यरात्री चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून लाकडी कपाटातील सुमारे तीन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास शेजारी अजय मराठे यांना वंजारी यांच्या घराचे कुलूप तोडल्याचे दिसले. त्यांनी त्वरीत याबाबत ईश्वर वंजारी यांना ही माहिती कळवली.

 

त्यानंतर ईश्वर वंजारी एरंडोलला आल्यानंतर चोरट्यांनी घरातील 35 ग्रॅमची पोत, 20 ग्रॅमच्या बांगड्या, 15 व 5 ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या व अन्य दागिने असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरी झाल्याचे लक्षात आले. दरम्यान, वंजारी यांच्याकडे दागिन्यांची बिले न सापडल्याने केवळ 5 ग्रॅमच्या चोरीची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !