खासदार डॉ.सुभाष भामरे म्हणाले ; धुळे-दादर एक्स्प्रेस नियमित करण्यासह रेल्वे समस्या सोडवा


भुसावळ : धुळे-दादर एक्स्प्रेस नियमित करावी तसेच धुळे-पुणे एक्स्प्रेसचा प्रस्ताव तयार करावा, धुळे स्टेशन आरयुबी अंडरपासचा प्रश्न सोडवावा, अमृत भारत योजनेअंतर्गत धुळे स्थानक नियोजन करावे आदी सूचना धुळ्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी मांडल्या. निमित्त होते ते मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी नागपूर येथे नागपूर व भुसावळ विभागाचे डीआरएम आणि खासदारांच्या बैठकीचे. शुक्रवारी आयोजित या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदारांसह 11 पैकी सहा गैरहजर राहिल्याने जळगाव जिल्ह्यातील रेल्वेच्या समस्यांवर बैठकीत चर्चा होऊ शकली नाही.

यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला खासदार हेमंत गोडसे (नाशिक), खासदार डॉ.सुभाष भामरे (धुळे), खासदार ज्ञानेश्वर पाटील (खंडवा), खासदार अनिल एस.बोंडे (अमरावती) व खासदार दुर्गादास उईके (बैतुल) यांचा समावेश होता. यावेळी जीएम नरेश ललवाणी यांनी सर्वांचे स्वागत केले. सदस्यांनी त्यांना नवीन लाईन, दुहेरीकरण, तिसरी लाईन, विद्युतीकरण, एफओबी, आरओबी, आरयुबीद्वारे लेव्हल क्रॉसिंग गेट बंद करणे, अमृत भारत स्टेशन नियोजन, स्टेशन पुनर्विकास नियोजन, लिफ्ट, एस्केलेटर, नवीन प्लॅटफॉर्म, कव्हर शेड आदींची माहिती दिली. यावेळी नागपूर विभागाचे डीआरएम तुषार कांत पांडे, भुसावळ विभागाचे डीआरएम एस.एस. केडिया यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पाच खासदारांनी मांडल्या सूचना
बैठकीत खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा आणि पायाभूत सुविधांबाबत सूचना मांडल्या. खासदार हेमंत गोडसे यांनी पंचवटी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेसचे विविध मुद्यावर चर्चा केली, बैतुलचे खासदार दुर्गादास उईके यांनी रेल्वे कोर्ट, ट्रेन थांबा, लेव्हल क्रॉसिंग गेट क्र. 257 आरयुबी, माल शेड यावर चर्चा केली तसेच नागपूर-भुसावळ एक्स्प्रेस (इटारसी मार्गे) सुरू करणे बाबत चर्चा केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !