के.टी.वेअर बंधार्‍यावरून पडल्याने वडगाव टेकच्या मजुराचा मृत्यू


Vadgaon Tech laborer dies after falling from KT Weir embankment पाचोरा : के.टी.वेअर बंधार्‍यावरून दुचाकीवरून जात असलेल्या मजुराचा तोल जावून पडल्याने मृत्यू झाला. प्रवीण वामन पाटील (45) असे मयताचे नाव आहे.

के.टी.वेअरवरून पडल्याने मृत्यू
पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथील रहिवासी प्रवीण वामन पाटील (45) हे शनिवार, 8 जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता मोटरसायकलने वडगाव टेक येथील केटीवेअर वरुन जात असताना केटीवेअर वरुन खाली पडल्याने त्यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थ व रुग्णवाहिका चालक निळु पाटील यांच्या मदतीने प्रवीण पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी प्रवीण पाटील यांना मृत घोषित केले.

पाचोरा पोलिसात नोंद
या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल भगवान बडगुजर हे करीत आहे. मयत प्रवीण पाटील यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, दोन मुली, एक भाऊ असा परीवा आहे. अतिशय मनमिळाऊ व हातमजुरी करून आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह चालविणारे प्रवीण पाटील यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने वडगाव टेक सह परीसरात शोककळा पसरली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !