संतापजनक : पारोळा गटविकास अधिकार्‍याविरोधात विनयभंगाचा गुन्हा


Outrageous: Rape case against Parola Group Development Officer पारोळा : पारोळा गटविकास अधिकारी विजय दत्तात्रय लोंढे (44, रा. जळगाव) याच्याविरुद्ध महिला कर्मचार्‍याचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संशयित लोंढे यांनी महिला कर्मचार्‍याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे.

गुन्हा दाखल झाल्याने खळबळ
36 वर्षीय पीडीता एका पदावर कार्यरत असून 12 डिसेंबर 2023 ते 23 जून 2023 दरम्यान संशयित आरोपी असलेल्या लोंढे यांनी अनेकादा वाईट हेतूने महिलेकडे पाहिले तसेच ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या दिवशी महिलेस कारणे दाखवा नोटीस बजावली व याबाबत ही महिला जाब विचारण्यासाठी गेली असता अधिकार्‍याने तिला अजूनही वेळ गेली नसल्याचे सांगितले. या प्रकाराला कंटाळून या महिलेने जादा प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्याने तिची प्रकृती बिघडली. गटविकास अधिकारी महिलेस दालनात बोलावून विचित्र हावभाव करीत असल्याने महिलेने पतीला सांगण्याची धमकी दिली. यावर या अधिकार्‍याने तिला बदनाम करण्याचा दम भरला. तपास उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !