कठोर्यातील दुचाकीस्वाराचा मृत्यू : अज्ञाताविरोधात गुन्हा
The Death of a Biker in Hardship : A Crime Against the Unknown जळगाव : कठोरा येथील दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला होता. या प्रकरणी अज्ञात मालवाहू रीक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कपिल अशोक सपकाळे (24, कठोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील कठोरा येथील तरुण कपिल सपकाळे हा जळगाव शहरात खाजगी नोकरीला होता.
जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा
शुक्रवार, 7 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कपिल हा त्याची दुचाकी क्रमांक (एम.एच.19 ए.जे.6284) ने घरी जाण्यासाठी कानळदा मार्गे कठोरा येथे येत असताना कानळदा गावाजवळून जात असतांना मालवाहू अॅपे (क्रमांक एम.एच.19 एस. 7900)ने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने कपिलचा जागीच मृत्यू झाला होता. अपघात करणी शनिवारी मध्यरात्री एक वाजता मालवाहू अॅपे रीक्षावरील अज्ञात चालकावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार लिलाधर महाजन करीत आहे.


