Suicide of a minor girl in Jalgaon city जळगाव शहरातील अल्पवयीन तरुणीची आत्महत्या
Suicide of a minor girl in Jalgaon city जळगाव : बारावीत शिकणार्या अल्पवयीन तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी शनिवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पल्लवी सुरेंद्र भालेराव (17, सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीत पल्लवी भालेराव ही आई, वडील आणि मोठा भावासह वास्तव्याला होती. नुकतेच तिने बारावी कॉमर्स मध्ये सिध्दीविनायक महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून पल्लवी ही कोणत्यातरी तणावात होती. सोमवार, 3 जुलै रोजी तिने घरात कुणीही नसतांना घरात गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. नातेवाईक व शेजारच्यांनी तातडीने धाव घेत तिला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
शनिवार, 8 जुलै रोजी तिची प्रकृती अधिक खालावल्याने खाजगी रुग्णालयातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालविली. यावेळी आप्तांनी मोठा आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत पल्लवीच्या पश्चात आई अलका, वडील आहेत.


