शिंदे-ठाकरे वाद : 16 आमदारांच्या अपात्रतेवर 14 रोजी सुनावणी


Shinde-Thackeray Controversy : Hearing on disqualification of 16 MLAs on 14th मुंबई : शिवसेनेचा वाद आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचल्यानंतर 16 आमदारांच्या अपात्रतेवर 14 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष अपात्रता याचिकेवर निर्णय घेण्यास चालढकल करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

याचिकेद्वारे केला हा गंभीर आरोप
शिंदे-ठाकरे गटाच्या वादावर 11 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांना मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. तरी देखील राहुल नार्वेकर जाणूनबुजून सुनावणीला उशीर करत असल्याचा आरोप या याचिकेतून केला आहे. यावर 14 जुलैला सुनावणी होण्याची शक्यता आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !