जळगावातील बांधकाम व्यावसायीकाला क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून दहा लाखांचा गंडा


A construction businessman in Jalgaon was extorted 10 lakhs through crypto currency जळगाव : क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून जळगावातील बांधकाम व्यावसायीकाला दहा लाख 41 हजारांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी भामट्यांविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
28 वर्षीय तक्रारदार हे बांधकाम व्यावसायीक आहेत. 28 जून ते 23 जुलै 2023 दरम्यान 8227665094 या क्रमांकावरून तसेच आलोककुमार नामक टेलिग्राम धारकाने प्रीपेड टास्कमध्ये क्रिप्टो करन्सीत जादा गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून दहा लाख 41 हजार रुपये वेळोवेळी ऑनलाईन पद्धत्तीने स्वीकारले. गुंतवणुकीनंतर कुठलाही परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसात तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक बी.डी.जगताप करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !