के.टी.वेअरवरून चालताना दुचाकीच्या धक्क्यामुळे तरुणाचा मृत्यू : एकाविरोधात गुन्हा


पाचोरा : के.टी.वेअर बंधार्‍यावरून पायी जात असलेल्या मजुराला पाठीमागून आलेल्या दुचाकीने जबर धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजता घडली होती. या घटनेत प्रवीण वामन पाटील (45) यांचा मृत्यू ओढवला होता. या प्रकरणी दुचाकीस्वार भागवत ज्ञानेश्वर जाधव (वेरूळी बु.॥, ता.पाचोरा) यांच्याविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

धक्का लागल्याने मृत्यू
पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथील रहिवासी प्रवीण वामन पाटील (45) हे शनिवार, 8 जुलै रोजी दुपारी चार वाजता वडगाव टेक येथील केटीवेअर वरुन जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार भागवत जाधव याने प्रवीण पाटील यांना जोरदार धक्का लागल्याने ते केटीवेअर वरुन खाली पडल्याने त्यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मयत झाले होते. या घटनेची माहिती ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थ व रुग्णवाहिका चालक निळु पाटील यांच्या मदतीने प्रवीण पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी प्रवीण पाटील यांना मृत घोषित केले होते. या प्रकरणी विनोद पाटील पाटील (45, वडगाव टेक) यांच्या फिर्यादीवरून दुचाकीस्वार भागवत जाधव (वेरूळी बु.॥) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार दिलीप वाघमोडे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !