अत्याचारातून पाचोरा तालुक्यातील महिला गर्भवती : आरोपीला सात वर्ष शिक्षा


Pachora taluka woman pregnant due to torture : Accused sentenced to seven years जळगाव : पाचोरा तालुक्यातील आदिवासी समाजातील एका महिलेवर जबरीने अत्याचार करण्यात आल्यानंतर त्यातून महिला गर्भवती राहिली होती. या गुन्ह्यातील आरोपी आबा उर्फ शंकर देविदास भिल या आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. शरद पवार यांनी सोमवारी सुनावली.

शेतात केला अत्याचार :पीडीता गर्भवती
पाचोरा तालुक्यातील पीडीता एका गावात वास्तव्याला असून आदिवासी भाषेशिवाय तिला कोणतीही भाषा येत नाही. याचा गैरफायदा घेवून आरोपी आबा उर्फ शंकर देविदास भील याने सन 2018 मध्ये नवरात्रीच्या काळात पीडीत महिलेला शेतात बोलावून तीन दिवस अत्याचार केला तसेच ही घटना कुणाला सांगितली तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर काही दिवसांनी पीडीता महिला गर्भवती असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडीतेची साक्ष ठरली महत्त्वाची
सरकार पक्षातर्फे एकुण 10 साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडीत महिलेचा न्यायालयात जबाब नोंदवितांना अनुवादक म्हणून शोभा पाटील यांनी सहकार्य केले व गुन्ह्यातील जबाब न्यायालयासमोर दिला. पीडीत महिला आणि तिचे बाळ आणि आरोपी यांचे डीएनए जुळवून आल्याने न्यायमुर्ती शरद पवार यांनी अत्याचार करणारा आबा उर्फ शंकर देविदास भील याला दोषी ठरवत सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दोन हजारांचा दंड सुनावला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी प्रभावी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी हर्षवर्धन सपकाळे होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !