पारंबीतील तरुणाचा विद्युत शॉक लागल्याने मृत्यू
मुक्ताईनगर : तालुक्यातील पारंबी येथील 18 वर्षीय तरुणाचाा विजेचा धक्का लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. गौरव संतोष झांबरे (18, पारंबी, ता.मुक्ताईनगर) असे मयताचे नाव आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मलकापूरात मालवली प्राणज्योत
1 जुलै रोजी दुपारी 12 वाजता गौरव झांबरे याला विजेचा धक्का लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला प्राथमिक उपचार घेण्यासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर ही नोंद मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष चौधरी करीत आहे.
