मंत्री असलो तरी मी आजही कार्यकर्ताच !
यावल शहरात कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटील : पदाधिकार्यांकडून सत्कार
यावल : राज्याचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी कृउबाला धावती भेट दिली. आपण अनिल दादाच आहोत, मंत्री झालो तरी मी सामान्य कार्यकर्त्याच आहे म्हणून कुठलेही काम असो आपण हक्काने सांगावे, असे प्रसंगी कार्यकर्त्यांशी बोलताना कॅबिनेट मंत्री पाटील यांनी सांगितले. यावल शहरात रावेर येथे जात असतांना राज्याचे नवनियुक्त कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी धावती भेट दिली. भाजपा व राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र आले.
पदाधिकार्यांची मोठ्या संख्येने उपस्थितती
बाजार समितीच्या सभागृहात भाजपाकडून अमोल हरीभाऊ जावळे, बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य सविता भालेराव, भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, डॉ.कुंदन फेगडे, नारायण चौधरी, विलास चौधरी, उजैन्नसिंग राजपूत, डॉ.निलेश गडे, अजय भालेराव, रीतेश बारी, भूषण फेगडे, व्यंकटेश बारी, परष नाईक, मीना तडवी, अतुल भालेराव, बबलु घारू, पी.एस.सोनवणे, देविदास धांगो पाटील, योगेश चौधरी व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत सत्कार
यावल शहरात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कॅबीनेट मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा सत्कार केला. यावेळी प्रामुख्याने यावल येथे युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील हेदेखील उपस्थित होते. त्यांच्या.सह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड.देवकांत पाटील, युवक जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, पक्ष समन्वयक किशोर माळी, कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे , नरेंद्र सोनवणे, पवन खर्चे, विजय पाटील, विशाल पाटील, महेश पाटील, अजय पाटील, छबीर खान, गिरीष पाटील, राकेश पाटील सह आदींची उपस्थिती होती.
चिंचोली येथे स्वागत
मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे चिंचोली येथेदेखील जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी अनिल साठे, सरपंच अनिल साळुंके, उपसरपंच जयवंत साठे, प्रदीप सोळुंके, वासुदेव साठे, प्रशांत साठे, श्याम बडगुजर, प्रेमचंद पाटील, जे.डी.सी.सी.बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक अशोक पाटील, बंडु पाटील, संजय साळुंके, महेंन्द्र पाटील, आबा पाटील, डॉ.निलेश मोरे, उंटावद वि.का.सोसा.चे चेअरमन शशीकांत पाटील, जगदीश पाटील सह आदींची उपस्थिती होती.
