शेंदुर्णी-जामनेर बसमधून महिलेची 66 हजारांची पोत लंपास


पहूर : शेंदुर्णी-जामनेर बसमधून प्रवास करणार्‍या महिलेची 66 हजार रुपये किंमतीची पोत भामट्यांनी लंपास केली. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कळवणच्या महिलेला आर्थिक फटका
ललिता कैलास काळे (51, कळवण, जि.नाशिक) या शेंदुर्णी ते जामनेर दरम्यान रविवार, 9 जुलै रोजी दुपारी 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास बसने येत असताना प्रवासात अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील नऊ ग्रॅम वजनाची व 66 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पहूर येथे बसस्थानकात उतरल्यानंतर त्यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तपास सहाय्यक फौजदार रवींद्र देशमुख करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !