A hostel for tribal students at Pal in Faizpur city पाल येथील आदिवासी विद्यार्थ्यांसाठीचे वसतीगृह फैजपूर शहरात


A hostel for tribal students at Pal in Faizpur city यावल : रावेर तालुक्यातील पाल येथील आदिवासी विद्यार्थ्यांसाठीचे वसतीगृह अखेर फैजपूर शहरात स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी विद्यार्थ्यांची वसतीगृह स्थलांतराची मागणी होती व या मागणीच्या अनुषंगाने यावल प्रकल्प कार्यालयाकडून प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता व त्यास आता मंजुरी मिळाली आहे.

विद्यार्थ्यांच्या मागणीला अखेर यश
यावल शहरातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रावेर तालुक्यात पाल येथे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह होते. येथील क्षमता 75 विद्यार्थ्यांची होती मात्र या वसतीगृहात पूर्ण क्षमतेने विद्यार्थी प्रवेशीत होत नव्हते. या उलट जिल्ह्यातील इतर वसतीगृहात विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना पंडीत दिन दयाल उपाध्याय स्वंय योजनेतून लाभ दिला जायचा तर अनेक वर्षांपासून आदिवासी विद्यार्थ्यांची पाल येथील वसतिगृह फैजपूर शहरात स्थलांतर करावे, अशी मागणी होती. या मागणी नुसार गेल्या काही वर्षांपासून यावल कार्यालयाकडून प्रशासनाकडे प्रस्ताव देण्यात येत होता. आता फैजपूर येथे वसतिगृह स्थलांतरीत करण्यास शासनाने सोमवार, 10 जुलै रोजी मंजुरी दिली आहे. या आशयाचे आदिवासी विकास विभागातर्फे परीपत्रक जारी करण्यात आले आहे. वसतीगृह स्थलांतर होत असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !