रोटरी क्लब ऑफ भुसावल ताप्ती व्हॅलीचे पदग्रहण उत्साहात
मनीषा पाटील यांनी स्वीकारला अध्यक्षपदाचा कारभार
Rotary Club of Bhusawal Tapti Valley takes over with enthusiasm भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे पदग्रहण मंगळवार, 11 रोजी रोटरी हॉलमध्ये झाले. यावेळी माजी अध्यक्ष डॉ.संजू भटकर यांनी नूतन अध्यक्ष पदाचा पदभार मनिषा पाटील (Manisha Patil took charge of the post of President ) यांना तर सेक्रेटरी पदाचा पदभार मनीषा पाटील यांनी किशोर पाचपांडे यांना सोपवला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी प्रमुख पाहणे म्हणून पीडीजी राजीव शर्मा यांनी रोटरी विषयी सखोल माहिती व रोटरीची कार्यपद्धती रोटरीत का यावे? आंतरराष्ट्रीय स्तरावर रोटरीचे सामाजिक योगदान किती मोठे आहे? याविषयी मार्गदर्शन केले. एजी प्रदीप पाटील यांनी या वर्षाची थीम आणि डीजीआशा वेणू गोपाल यांचा शुभेच्छा संदेश सांगितला. प्रा.विवेक जोशी, ‘लोकमत’चे छायाचित्रकार श्याम गोविंदा यांना इंडक्ट करण्यात आले. या प्रसंगी रजनी सावकारे, प्रा.डॉ.रश्मी शर्मा, महानंदा पाटील, राखी भराडे, अलका भटकर, विकास कात्यायाणी, तेजस नवगाळे, उमेश नेमाडे, शांताराम पाटील, प्रा.मनोज महाजन, सुधीर पाटील, संजय पाटील, सुधाकर सनांन्से, सुनील शिरनामे, सुधीर शर्मा, अनिकेत पाटील, यशवंत महाजन, राकेश पाटील, प्रणाली पाटील, महिमा शर्मा उपस्थित होत्या. सूत्रसंचलन धमेंद्र मेंडकी यांनी तर आभार डॉ.संजू भटकर यांनी मानले. विविध सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सचिव आणि भुसावळ येथील रोटरी क्लब, इनरव्हील, प्रतिष्ठा महिला मंडळ, जॉईंट ग्रुप, वसुंधरा ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.

