ओंकारेश्वर, उज्जैनसह त्र्यंबकेश्वरसाठी हव्यात बसेस : डॉ.कुंदन फेगडे
Buses for Trimbakeshwar including Omkareshwar, Ujjain : Dr.Kundan Phegde यावल : शहरातील एस.टी.आगारात भाजपा वैद्यकिय आघाडीचे डॉ.कुंदन फेगडे यांनी निवेदन देत यावल-ओंकारेश्वर, उज्जैन (मध्यप्रदेश), व त्रंबकेश्वर (महाराष्ट्र) येथे बस सेवा सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
बस सुरू झाल्यास भाविकांची गैरसोय टळणार
आगामी श्रावण मासाच्या पार्श्वभुमीवर भाविकांना येण्या -जाण्यासाठी विशेष बसेस उपलब्ध कराव्यात, अशी त्यांची मागणी आहे. येत्या सोमवारपासून श्रावण मासाला सुरुवात होत आहे. या निमित्याचे यावल ते ओंकारेश्वर (मध्यप्रदेश), उज्जैन (मध्यप्रदेश) व त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र) या ठिकाणी भाविक मोठ्या श्रद्धेने यात्रा करतात. भाविकांची सुविधा व्हावी यासाठी यावल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याकडे भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ.कुंदन फेगडे यांनी निवेदन दिले आहे. यावल तालुक्यातून दरवर्षी श्रावण मासात भाविक, भक्त विविध देवस्थानावर जात असल्याने बस सेवेमुळे भाविकांना सुविधा व आगाराच्या उत्पन्नादेखील वाढ होणार आहे.

