सोशल मिडीयावर भावना दुखावणारा मजकूर : जळगावातील वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याविरोधात गुन्हा


Hurting text on social media: Crime against medical student in Jalgaon जळगाव : जळगाव एमआयडीसी परीसरातील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्‍या संशयित मोहम्मद शाहीद शेख अब्दुल रहिम (मोमीन मोहल्ला, न्हावी) याने सोशल मिडीयावर दोन धर्मात तेढ निर्माण होईल, असा मजकूर प्रसारीत केल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस स्वतः झाले फिर्यादी
जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका नामांकित मेडीकल महाविद्यालया वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या मोहंमद शाहीद शेख अब्दुल रहिम या विद्यार्थ्याने मंगळवार, 11 जुलै रोजी सकाळी 10 वाजता इन्स्ट्राग्रामवर धार्मीक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे समोर आले. ही पोस्ट ठिकठिकाणी व्हायरल केली. यामुळे एका समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने या प्रकरणी रात्री आठ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मंदार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मोहंमद शाहीद शेख अब्दुल रहिम विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !