जळगावात सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाला दमदाटी : दोघांविरोधात गुन्हा
Assault on Assistant Motor Vehicle Inspector in Jalgaon : Crime against both जळगाव : शहरातील काव्यरत्नावली चौकातील आरटीओ कार्यालयात दोघांनी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकाला अश्लिल शिविगाळ करीत दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवार, 12 जुलै रोजी दुपारी तीन वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा
जळगाव शहरातील काव्यरत्नाली चौकानजीक आरटीओ विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयात विशाल भगवान बटुळे (31, आदर्श नगर, जळगाव) हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक असून सध्या ते कार्यालयीन अधीक्षकपदाचा देखील कार्यभार सांभाळत आहे. शुक्रवार, 7 जुलै रोजी ते दैनंदिन काम करत असताना दुपारी चार वाजेच्या सुमारास आरटीओचे खाजगी स्वरूपात काम करणारे एजंट गणेश ढेंगे व सुलतान मिर्झा या दोघांनी विशाल बटुळे यांच्यावर मोठ-मोठ्याने ओरडत अश्लील शिविगाळ करून दमदाटी केल्याचा आरोप आहे. कार्यालयीन सहकार्यांनी हा वाद मिटवल्यानंतर दोघे निघून गेले. यासंदर्भात सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक विशाल बटुळे यांनी बुधवारी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर दोघांविरोधात भादंवि 294, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


