जळगावात रेल्वेेच्या धक्क्याने 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू


A 28-year-old man died after being hit by a train in Jalgaon जळगाव : धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने शहरातील 28 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भावेश मुरलीधर सोनार (28) असे मृताचे नाव आहे. रेल्वे ट्रॅकच्या बाजुला शौचालयाला गेल्यानंतर ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.

हरीविठ्ठल नगरात शोककळा
हरीविठ्ठल नगर भागात भावेश सोनार हा युवक आपल्या आई, वडिल व मोठ्या भावासह वास्तव्याला होता. बुधवार, 12 जुलै रोजी रात्री घरी आल्यानंतर 9 वाजेच्या सुमारास घरातून शौचालयासाठी निघाला. रात्री 9.30 वाजेच्या सुमारास रेल्वे ट्रॅकलगत रेल्वेचा धक्का लागल्याने भावेशचा मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली. याबाबतची माहिती रेल्वे ट्रॅकलगत असलेल्या काही युवकांनी रात्री पोलीसांना दिली. हरीविठ्ठल नगरातील काही युवकांनी मृतदेह पाहिल्यानंतर भावेशची ओळख पटली. भावेशच्या मृतदेहावर शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात सोपवण्यात आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !