पाचोरा शहरातील 19 वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या : सासरच्यांवर छळाचा आरोप


Suicide of 19-year-old newlywed in Pachora City : In-laws accused of harassment पाचोरा : सासरच्या छळाला कंटाळून 19 वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.काजल राहुल राठोड (19) असे मयत युवतीचे नाव आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विवाहितेस सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास होत असल्यानेच विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप विवाहितेकडील मंडळींनी केला आहे.

विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ
पाचोरा तालुक्यातील कुर्‍हाड तांडा येथील रहिवासी राहुल चव्हाण याचा प्रेमविवाह लिहा तांडा, ता.जामनेर येथील काजल राठोड हिच्याशी तीन महिन्यांपूर्वी झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगली वागणूक मिळाल्यानंतर काजल हिला आजल सासु सुग्राबाई चव्हाण, सासु मुक्ताबाई चव्हाण, चुलत सासु पार्वतीबाई चव्हाण ह्या किरकोळ कारणावरून टोचुन बोलत असल्याने त्यांच्यात वाद सुरू होते. सतत होणार्‍या भांडणामुळे राहुल चव्हाण हा 10 जुलै रोजी काजल सोबत पाचोरा येथील गोविंद नगर भागात भाड्याची खोली घेऊन राहायला आला होता. दरम्यान, गुरुवार, 13 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास काजल हिने टोकाचे पाऊल उचलत घराच्या मागच्या बाजूला असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली.

सासरच्या मंडळींवर आरोप
याबाबतची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने काजल हीस पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी काजल हीस मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात काजल हिच्या आईसह माहेरच्या मंडळींनी एकच आक्रोश करत सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून काजल हिने आत्महत्या केल्याचाचा आरोप केला. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !