चाळीसगावात 58 हजारांचा गुटख्याचा साठा जप्त


58 thousand Gutkha stock seized in Chalisgaon चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील परीवार कलेक्शन समोरील पाटीलवाडा भागातील विजय चंद्रकांत देवरे यांच्या घरातून 57 हजार 638 रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी देवरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव शहरातील परवार कलेक्शन समोरील पाटीलवाडा भागातील विजय देवरे यांच्याकडे घरात बेकायदेशीररीत्या गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलिसांनी गुरुवार, 12 जुलै रोजी रात्री 8 वाजता धडक कारवाई करत असताना 57 हजार 638 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी विजय चंद्रकांत देवरे (पाटीलवाडा, चाळीसगाव) याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित मात्र पसार झाल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाल सहायक पोलीस निरीक्षक सागर ढिकले, हवालदार योगेश बेलदार, दीपक पाटील, अमोल भोसले, प्रवीण जाधव, प्रकाश पाटील, सबा शेख आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !