अजित पवारांना अर्थ खाते ; खडसे म्हणाले ; हे तर नाराज आमदारांवर मीठ चोळण्याचे काम


Ajit Pawar gets money ; Khadse said ; This is a work of rubbing salt on the disgruntled MLAs भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी 2 जुलैला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या आणखी आठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. नव्या मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत उत्सुकता तसेच अजित पवारांना अर्थ खाते देण्यास शिवसेना शिंदे गटातील आमदारांचा प्रचंड विरोध असतानाही शुक्रवारी खाते वाटपात अर्थ खाते अजित पवारांकडे देण्यात आल्यानंतर भुसावळात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी याबाबत मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. निधी वाटपात असमानता असल्यानेच शिंदे गट बाहेर पडला होता शिवाय अजित पवारांविषयी त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती मात्र आता अजित पवारांना अर्थ खाते देवून नाराज आमदारांना मीठ चोळण्याचे काम करण्यात आल्याचे खडसे भुसावळात म्हणाले.

अनुभवी माणसास प्राधान्य
अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिवसेना शिंदे गटाचा विरोध असल्याने खातेवाटपाचा तिढा निर्माण झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून हा तिढा सुटताना दिसत नव्हता. या तिढ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात सातत्याने बैठका पार पडल्या तर शुक्रवारी दुपारी मात्र खाते वाटपाबाबत संभ्रम दूर झाल्यानंतर अजित पवारांना अर्थखाते देण्यात आले. या संदर्भात आमदार खडसे यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी हा प्रकार म्हणजे नाराज आमदारांना मीळ चोळण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. अजितदादा अनुभवी नेते असून अनुभव असलेल्या नेत्याला त्यामुळेच हे खाते दिले असावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !