चोपडा शहरात धूम स्टाईल एक लाख 32 हजारांचे मंगळसूत्र लांबवले
One lakh 32 thousand mangalsutras were extended in Dhoom style in Chopra city चोपडा : जिल्ह्यात धूम स्टाईल चोर्या काही दिवसांच्या अंतरावर पुन्हा सुरू झाल्याने महिलावर्गात घबराट पसरली आहे. चोपडा शहरातील यावल रोडवरील एम.जी. कॉलेज समोरून पायी जाणार्या महिलेच्या गळ्यातून भामट्यांनी धूम स्टाईल येत एक लाख 32 हजार रुपये किंमतीची सोन्याचे मंगळसूत्र लांबवले. ही घटना मंगळवार, 11 रोजी सायंकाळी 6.45 वाजता घडली. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
असे आहे धूम स्टाईल चोरी प्रकरण
सुवर्णा राजेंद्र सैंदाणे (52, महालक्ष्मी नगर, यावल रोड, चोपडा) या महिला आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. मंगळवार, 11 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास त्या यावल रोडने घरी पायी जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीवरून दोघांपैकी एकाने महिलेच्या गळ्यातील 33 ग्रॅम वजनाची सुमारे एक लाख 32 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरी हिसकावून दुचाकीवरून पळ काढला. महिलेने आरडा-ओरड केली तोपर्यंत दोघे दुचाकीने पसार झाले. महिलेने चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेबाबत माहिती देत तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहे.


