जळगावात माथेफिरूचा रेल्वे हायटेंशन लाईनला स्पर्श होताच मृत्यू
जळगावः शहरातील रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीच्या बोगीवर चढून
एका माथेफिरूने हायटेंशन लाईनला स्पर्श केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवार, 14 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारजवळ एका उभ्या असलेल्या मालवाहू रेल्वेच्या डब्यावर उभा राहिल्याने एका अनोळखी अंदाजे 50 वर्षीय व्यक्तीचा रेल्वेच्या विद्युत तारेला स्पर्श होताच जागीच मृत्यू झाला.
ही घटना घडल्यानंतर रेल्वे पोलीस ठाण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अतीफ शहा यांनी तपासणी यांची मयत घोषित केले. रेल्वे पोलीस कर्मचार्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जीकच्या जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. या घटनेबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास रेल्वे पोलीस कर्मचारी सचिन कुमार भावसार करीत आहे.


