जळगावातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग : तरुणाविरोधात गुन्हा
Rape of minor girl in Jalgaon : Crime against youth जळगाव : शहरातील कोल्हेनगर परीसरातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत जीवे ठार मारण्याची धमकी देणार्या तरुणाविरोधात शुक्रवारी रात्री जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयिताविरोधात पोलिसात गुन्हा
कोल्हे हिल्स परीरातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 14 जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घरी कोणीही नसताना त्या ठिकाणी संशयित आरोपी भारत सुभाष सूर्यवंशी (34, चंदूअण्णा नगर, जळगाव) हा तरुण दुचाकीने त्या ठिकाणी आला. त्यावेळी पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिची सहा वर्षांची बहिण घरी असताना संशयित आरोपी भरत सूर्यवंशी याने तरुणीसोबत अश्लील कृत्य करीत तिचे कपडे फाडले. हा प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीच्या लहान बहिणीने आरडाओरड केल्यानंतर परीसरातील नागरीकांनी धाव घेऊन त्याला रंगेहात पकडले.
कुटूंबाचा सत्यानाश करण्याची दिली धमकी
दरम्यान हा प्रकार कुणाला सांगितला, तर तुझ्या घराचा सत्यानाश करेल, अशी धमकी आरोपीने दिली. तालुका पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक रुपाली महाजन यांच्यासमोर दिलेल्या जबाबादावरून संशयित आरोपी भारत सुभाष सूर्यवंशी यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार करीत आहे.


