जळगावातील दुचाकी चोरटा जळगाव जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात


Two-wheeler thief in Jalgaon caught by Jalgaon district police जळगाव : जळगाव शहरातील नवीपेठ परीसरातील अनुभूती शाळेजवळून एका तरुणाची दुचाकी लांबविल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात दुचाकी चोरट्याला अटक करण्यात आली. चंद्रकांत रामदास साळुंखे (30, हिराशिवा कॉलनी) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव तालुक्यातील विटनेर येथील सुनील दिलीप सुर्यवंशी (30) हा तरुण 13 जुलै रोजी जळगाव शहरातील नवीपेठ परीसरात आला असता त्याची दुचाकी (एम.एच. 19 सी.पी. 9522) अनुभूती शाळेजवळून चोरीला गेल्याने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी चंद्रकांत रामदास साळुंखे याला अटक केली. तपास महिला पोलीस नाईक भारती देशमुख करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !