धरणगावातील विवाहितेचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू


A married woman in Dharangaon died after her foot slipped in a well धरणगाव : शहरातील मराठे गल्ली भागातील विवाहितेचा विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी घडली. पूनम राहुल पाटील (रा.मराठे गल्ली, धरणगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

तोल जावून पडल्याने मृत्यू
पाटील परीवारातील सदस्य भोणे शिवारातील आपल्या शेतात कापूस पिकाला खत देण्यासाठी गेले असता पूनम पाटील यांनी पती राहुल यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांना खताच्या गोण्या उचलून दिल्या. त्यानंतर दुपारी दोन ते तीनच्या सुमारास जेवण करण्यासाठी पुढे पांडुरंग पाटील यांच्या विहिरीवर गेल्ल्या असता बराच वेळ झाला म्हणून इतर सदस्य विहिरीजवळ गेले असता पूनम ह्या त्या ठिकाणी दिसल्या नाहीत. म्हणून त्यांनी विहिरीत डोकावले असता पूनम ह्या विहिरीचे पाण्यात बुडालेल्या दिसल्या. पूनम यांना तत्काळ बाहेर काढून धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषीत केले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !