वाहनाचे टायर फुटल्याने अपघात : जळगावातील तरुणाचा मृत्यू


Accident due to burst tire of vehicle : Youth dies in Jalgaon जळगाव : वाहनाचे अचानक टायर फुटल्याने झालेल्या अपघातात जळगावातील 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सुरज रामेश्वर जोमाळकर (24, तुकाराम वाडी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. जळगाव येथून सिहोरला जाण्यासाठी जळगावातील तरुण चारचाकी वाहनाने निघाल्यानंतर अचानक टायर फुटल्याने अपघात घडला. त्यात चालकासह इतर पाच जण गंभीर जखमी झाले. शनिवार, 15 जुलै रोजी सायंकाळी सेंधवा गावानजीक हा अपघात घडला.

चालकासह पाच जण जखमी
जळगाव शहरातील तुकाराम वाडी भागातील तरुण सुरज जोमाळकर हा त्याच्या इतर चार मित्रांसोबत शनिवार, 15 जुलै रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास भाडे तत्वावरील वाहन क्रमांक (एम.एच.19 डी.जे.7773) ने सिहोरला जाण्यासाठी जात असताना वाहनात चालकासह एकूण सहा जण होते. सायंकाळी सेंधवा गावाजवळून जात असतांना चारचाकी वाहनाचे टायर फुटल्याने गाडी उलटली. या अपघातात सुरज जोमाळकर हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. चालकासह इतर पाच जण गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक खोळबंली. जखमींना नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मयत सुरजचे नातेवाईक रात्री उशीरा सेंधव्याकडे रवाना झाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !