जळगावात घरगुती गॅसचा अनधिकृत वापर : एकाविरोधात गुन्हा


Unauthorized use of domestic gas in Jalgaon : Crime against one जळगाव : जळगाव शहरातील शिवाजीनगर परीसरात घरगुती गॅसचा काळाबाजार करुन गॅसचा वापर रीक्षात तसेच इतर वाहनांमध्ये केला जात असताना जळगाव शहर पोलिसांनी रविवावरी सायंकाळी कारवाई करीत संजय शंकरराव मोझर (51) विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल केला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातल शिवाजीनगर परीसरातील नवीन उड्डाणपूलाखाली एका टपरीमध्ये संजय मोझर नावाचा व्यक्ती हा घरगुती गॅसचा वापर वाहनांमध्ये भरण्यासाठी करत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांनी रविवारी सायंकाळी शिवाजीनगरात छापा टाकला. यात संशयित संजय शंकरराव मोझर याच्याकडून एक घरगुती वापराचे सिलेंडर तसेच ाीक्षात गॅस भरण्यासाठी लागणारे मोटार, पंप, गॅस रेग्युलेटर असा एकूण 17 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन संजय मोझर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे हे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !