जळगावात कोम्बिंगमध्ये हद्दपार गुन्हेगार जाळ्यात


जळगाव : हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण करीत शहरात सुरा बाळगून असलेल्या संशयिताच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत. विशाल मुरलीधर दाभाडे (22. चांगापाचा मंदीराजवळ, रामेश्वर, मोना कॉलनी, जळगाव) असे अटकेतील हद्दपार आरोपीचे नाव आहे.

कोम्बिंगमध्ये अडकला संशयित
एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहायक फौजदार अतुल वंजारी, ईम्रान सैय्यद, सचिन पाटील, सुधीर सावळे, मुदस्सर काझी कोम्बिंग करीत असताना संशयिताबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. कॉन्स्टैबल सतीश विठ्ठल गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !