17 वर्षांपासून वॉण्टेड आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जळगाव : मालकाकडे चोरी केल्याप्रकरणी संशयीत आरोपी संजय गुलाबराव पवार (37, रा.जयपूर उगले, पाघरी, ता.शिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा) याच्याविरुद्ध जळगाव जिल्हा पेठ पोलिसात भाग 5, गु.र.नं 103/2003 भादंवि 381 प्रमाणे गुन्हा दाखल होता मात्र तब्बल 17 वर्षांपासून आरोपी गुंगारा देत होता. संशयीत आरापी हा औरंगाबादच्या वाळूजमध्ये असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक महाजन, रवींद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अनिल जाधव, अशरफ शेख, दीपक पाटील, दादा भाऊ पाटील, दीपक शा.पाटील आदींच्या पथकाने केली. आरोपीला जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


