भुसावळसह चाळीसगावातील गुन्हेगार स्थानबद्ध : जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने खळबळ
Criminals in Bhusawal along with Chalisgaon are located: Excitement by the order of the Collector भुसावळ : गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या चाळीसगावसह भुसावळातील दोघांना स्थानबद्ध करण्याचे आदेश जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी सायंकाळी दिले आहेत. निखील उर्फ पिया सुनील कुडे (24, रा.एम.जे.नगर, चाळीसगाव) व शेख चाँद शेख हमीद (38, दीनदयाल नगर, जामनेर रोड, भुसावळ) अशी दोघांची नावे आहेत. संशयितांना अनुक्रमे कोल्हापूरसह नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
निखील कुडे कोल्हापूरात स्थानबद्ध
निखील उर्फ पिया सुनील कुडे हा 2018 पासून चाळीसगाव तालुक्यात विनापरवाना अवैधरीत्या वाळूची चोरी करुन विक्री करीत होता. त्याच्यावर वाळू चोरीचे पाच गुन्हे दाखल होते. त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याबाबत अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर निरीक्षक संदीप पाटील यांनी जळगाव पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाची पडताळणी झाल्यानंतर जिल्हादंडाधिकारी अमन मित्तल यांनी मान्यता दिली. एमपीडीए अंतर्गत कुडे यास एक वर्षासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
भुसावळातील शेख चाँद नागपूरात स्थानबद्ध
शेख चाँद शेख हमीद हा 2015 पासून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात साथीदारांसह खून करणे, जबरी चोरी करणे, अनैतिक देह व्यापार करणे, सरकारी कर्मचार्यांवर हल्ला करणे, हद्दपार आदेशाचे उल्लंघण करणे, फसवणूक करणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे अशा विविध प्रकारचे एकूण 11 गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेला आहे.
भुसावळ उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव
भुसावळचे नूतन पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी संशयित शेख चाँद यास स्थानबद्ध करण्याबाबत जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याांकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची पडताळणी झाल्यानंतर तो जिल्हादंडाधिकार्यांकडे पाठवण्यात आल्यानंतर त्यास मंजूरी दिल्याने त्याच्या विरोधात एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली.
