चाळीसगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Abuse of a minor girl in Chalisgaon taluka चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून या प्रकरणी अल्पवयीन तरुणासह एका महिलेविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
आत्महत्या करण्याची धमकी देत अत्याचार
सुमारे 15 वर्षीय पिडीता तालुक्यातील एका गावातील वास्तव्यास असून शिक्षण घेते. संशयितदेखील अल्पवयीन असून त्याने आत्महत्या करेल तसेच पीडीतेच्या कुटूंबाला फसवेल, अशी धमकी देत शहरातील विविध भागात पिडीतेवर 29 जून 2023 ते त्यानंतरच्या आठ दिवसानंतर अत्याचार केल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या कृत्यात एका अनोळखी महिलेनेदेखील मदत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करीत आहेत.


