सोशल मिडीयावर घातक शस्त्रांद्वारे हिरोगिरी : पाच संशयित चाळीसगाव पोलिसांच्या जाळ्यात


Heroism through deadly weapons on social media : Five suspects in Chalisgaon police net चाळीसगाव : समाजात दहशत निर्माण करणाच्या उद्देशाने सोबत प्राणघातक हत्यारे बाळगून सोशल मीडियावर ते फोटो व्हायरल करणार्‍या पाच तरुणांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

सोशल मिडीयावर करडी नजर
गुन्हे करणे, गावठी कट्टे, हत्यारे आदी प्राणघातक शस्त्र जवळ बाळगून समाजात दहशत निर्माण करणे याचबरोबर हत्यारांसह केक कापून वाढदिवस साजरे करण्याची सध्या तरूणांमध्ये मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या आदेशाने सोशल मीडिया मॉनिटरींग सेलची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांची करडी नजर सोशल मीडियावरील विविध घटनांकडे कायम आहे.

कारवाईने चाळीसगावात खळबळ
पोलिस शिपाई आशुतोष सोनवणे व रवींद्र बच्छे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काही तरुण प्राणघातक हत्यारे जवळ बाळगून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकत दहशत निर्माण करत असल्याचे समजले. यानंतर पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करुन मोईन अशपाक खाटीक (19), नाजीम नजोमुद्दीन खाटीक (19), तनवीर शाकीर खाटीक (18), तरबेज तौकीर खाटीक (24), आयान दयान खाटीक (20) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी दोन तलवारी व एक चॉपर असे हत्यारे काढून दिली आहे. ही हत्यारे पोलिसांनी जप्त केली असून ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, राहुल सोनवणे, महेंद्र पाटील, भूषण पाटील, रवींद्र बच्छे, समाधान पाटील, विजय पाटील, राकेश महाजन, पवन पाटील यांच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !