चोपडा शहरातील अल्पवयीन मजुराचा विद्युत शॉक लागल्याने मृत्यू
Minor laborer Died due to Electric Shock in Chopra City चोपडा : बांधकामाच्या ठिकाणी रोजंदारीवर काम करीत असलेल्या शहरातील हमीद नगरातील रहिवासी असलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मजूर मुलाचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, 18 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास तालुक्यातील कोळंबा येथे घडली. मुकेश सुरेश शिंदे (15, चोपडा) असे मयत तरुणाचे नाव आहे.
जागीच झाला मृत्यू
मयत मुकेश याची घरची परीस्थिती बेताची असल्याने कमी वयातच बांधकामावर मजुरीची वेळ आली. मुकेश नेहमीप्रमाणे चोपडा तालुक्यातील कोळंबा येथे मजुरीने कामाला गेला असता घराच्या स्लॅबचे काम करत असताना वायरला धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला नातेवाईक व सहकार्यांनी चोपड़ा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतू तपासणी केली असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.


