भुसावळात भाजपा नगरसेवकाला लुटले : दोघांविरुद्ध गुन्हा
भुसावळ : शहरातील भाजपाचे नगरसेवक किरण कोलते यांना विनाकारण शिवीगाळ करीत त्यांच्या खिशातील रोकड बळजबरीने हिसकावून नेल्याप्रकरणी दोघांविरुद्ध बाजारपेठ गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 23 रोजी रात्री पावणे बारा वाजता घडली. नगरसेवक कोलते हे के.के.ब्रदर्स नावाचे हॉटेल बंद करून घराकडे निघाले असताना जामनेर रोडवरील हॉटेल हेवन समोर संशयीत आरोपी संजय लोटन चौधरी व प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (रा.भुसावळ) यांनी विनाकारण शिवीगाळ करीत खिशातील पाच हजार 700 रुपयांची रोकड हिसकावून पोबारा केला. 23 रोजी रात्री 12.45 वाजता ही घटना घडली. या प्रकरणी गुरुवारी पहाटे 5.50 वाजता बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी करीत आहेत.


