जळगावात सेल्समन महिलेची मंगलपोत धूम स्टाईल लांबवली


Mangalpot dhoom style of salesman woman extended in Jalgaon जळगाव : शहरातील सराफा बाजारातील एका शोरुममध्ये कामाला असलेली सेल्समन महिला घरी जाताना दुचाकीने मागून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगलपोत लांबवल्याची घटना बुधवारी रात्री बोहरा गल्लीत घडली. ही माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अधिकार्‍यांची धाव
शहरातील सराफ बाजारातील एका सोन्याच्या शोरुमध्ये महिला कामाला आहे. ड्युटी संपल्यावर ही महिला बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी पायी निघाली. बोहरा गल्लीतील रस्त्याने जाताना मागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगलपोत हिसकावून पळ काढला. महिलेने आरडाओरड केली, परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल जैस्वाल यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !