भडगावच्या तरुणाची साडेपाच लाखांत फसवणूक

विमा पॉलीसीचा परतावा वाढवून देण्याचे आमिष


A youth of Bhadgaon was cheated of five and a half lakhs भडगाव : भडगाव तालुक्यातील तरुणाची विमा पॉलीसीचा परतावा वाढवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल पाच लाख 29 हजार 508 रुपयात फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोन भामट्यांविरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सायबर पोलिसात गुन्हा दाखल
4 फेब्रुवारीपासून तर आजपर्यंत दीपककुमार तिवारी व हेमंत सरकार असे नाव सांगणार्‍या दोन अनोळखी इसमांनी स्वतःची ओळख लपवून मो.क्रं. 8116799318 व 9540283461 यावरुन इीपक पितांबर चौधरी (38, रा.गुढे, ता.भडगाव) यांच्या मोबाईलवर वेळोवेळी संपर्क साधला तसेच त्यांना अविवा लाईफ इन्शुरन्स पॉलिसी कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून विमा पॉलीसीचा परतावा वाढवून देण्याचे आमिष दाखवले परंतु प्रत्यक्षात कोणताही परतावा न देता दीपक चौधरी यांना वेगवेगळे कारणे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन एकूण पाच लाख 29 हजार 508.60 एवढी रक्कम स्विकारुन फसवणूक केली. या प्रकरणी दीपककुमार तिवारी व हेमंत सरकार, असे नाव सांगणार्‍या इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !