भुसावळातील भाजपा नगरसेवक कोलतेंसह सहा जणांविरुद्ध गुन्हा


भुसावळ- शहरातील हॉटेल हेवनसमोर गाळ्याचे बांधकाम सुरू असताना तक्रारदाराला शिवीगाळ करीत तक्रारदाराच्या मुलासह त्याच्या भाच्याच्या दुचाकीवर दगडफेक करून वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक किरण कोलते यांच्यासह सहा जणांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 23 रोजी रात्री 12.45 वाजता ही घटना घडली. बांधकाम ठेकेदार संजय लोटन चौधरी (पंढरीनाथ नगर, जामनेर रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार संशयीत आरोपी किरण कोलते, किशोर पाटील, मयूर कोलते, कल्पेश ढाके, किशोर पाटील, दीपा पैलवान (सर्व रा.भुसावळ) यांनी हॉटेल हेवनसमोर 23 रोजी रात्री 12.45 वाजेच्या सुमारास दोन दुचाकींवर काही एक कारण नसताना दगडफेक करीत शिवीगाळ केली. तपास नाईक रमण सुरळकर करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !