टहाकळी येथील सुनेने पेटवून घेतले : सासुही होरपळली
The daughter-in-law at Tahkali set it on fire: the mother-in-law was also horrified पाळधी, ता.धरणगाव : येथून जवळच असलेल्या टहाकळी गावी मध्यरात्री सुनेने अचानक स्वतःला पेटवून घेतल्याने सुनेचा मृत्यू झाला तर सुनेच्या मदतीसाठी धावलेली सासू 50 टक्के भाजली. या घटनेत ममता सुधीर पाटील (28 या सुनेचा मृत्यू झाला तर लिलाबाई रमेश पाटील (50) या सासू गंभीररीत्या भाजल्या.
घटनेचे कारण अस्पष्ट
बुधवारी रात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान ममता पाटील यांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सून आगीत होरपळत असल्याचे बघताच मदतीला सासू लीलाबाई ह्या धावल्या. सुनेला वाचविण्यात त्यांना अपयश तर आलेच पण स्वतः देखील या 50 टक्के भाजल्या आहेत. घरात काही तरी भयंकर घडत असल्याचे लक्षात येताच नातेवाईकांसह गावकर्यांनी दोघांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, विवाहितेला स्वतःला का पेटवून घेतले याचं नेमकं कारण समोर समजू शकले नाही. या प्रकरणाची धरणगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे.


