अट्टल दुचाकी चोरटा एलसीबीच्या जाळ्यात : चोरीच्या पाच दुचाकी जप्त
Attal two-wheeler thief in LCB’s net : Five stolen two-wheelers seized जळगाव : अट्टल दुचाकी चोरट्याला जळगाव गुन्हे शाखेने अटक केली आहे. चोरट्याकडून पाचोरा, चाळीसगाव तसेच पारोळा व बोदवड तालुक्यात चोरी केलेल्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. संदीप अर्जून गुजर (शेंदुर्णी, ता.जामनेर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश चोभे, पोलीस हवालदार विजयसिंग पाटील, सुधारक अंभोरे, अक्रम शेख, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, विजय पाटील, रणजीत जाधव, सचिन महाजन, प्रीतम पाटील, अशोक पाटील, गोरख बागुल, हेमंत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी संदीप गुजर याच्या ताब्यातून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असून या दुचाकी चाळीसगावसह पारोळा, पाचोरा, बोदवड तालुक्यातून चोरण्यात आल्या आहेत. आरोपीला पाचोरा येथील गुन्ह्याच्या तपासकामी पाचोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.


