खान्देशातून दुचाकी लांबवणारा गुजरातचा अट्टल चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

चोरी केलेल्या 11 दुचाकी जप्त : एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई


A staunch thief from Gujarat who stole a bike from Khandesh in the net of MIDC police जळगाव : खान्देशातील तिन्ही जिल्ह्यातून दुचाकी लांबवणार्‍या अट्टल चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरी केलेल्या तब्बल 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गापाल भाईदास शिरसाठ (23, मराठी शाळेजवळ, पिळोदा, ता.शिरपूर, जि.धुळे, ह.मु.सफारी कॉम्प्लेक्स, बेस्तान, सुरत, गुजरात) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अजिंठा चौफुली परीसरातून आरोपीला गुरुवार, 13 रोजी अटक केल्यानंतर आरोपीने एमआयडीसी हद्दीतील गुन्ह्याची कबुली देत 11 दुचाकी काढून दिल्या.

पसार साथीदाराचा कसून शोध
अटकेतील गोपाल भाईदास शिरसाठ याने हे गुन्हे त्याचा साथीदार अमजद कुरेशी याच्या मदतीने केल्याची कबुली दिली तर अमजद पसार (तांबापूरा, जळगाव) झाल्याने त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. गोपाल शिरसाठ यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 20 जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व त्यांचे सहकारी सहायक निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, हवालदार गणेश शिरसाळे, अलताफ पठाण, नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, स्वप्नील पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, हेमंत पाटील, चंद्रकांत पाटील, ईश्वर भालेराव व हवालदार चालक इम्तियाज खान आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !