भुसावळात शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरेंना जयंतीनिमित्त अभिवादन


शिवसेनेतर्फे प्रतिमा पूजनासह शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

भुसावळ : शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळ व.बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन व वंदनाचा कार्यक्रम शिवसैनिकांतर्फे झाला. त्यानंतर भुसावळ रेल्वे स्टेशनजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अन्नदान करण्यात आले व त्यानंतर गरजू लोकांना उंबदार कपडे व अंगात घालण्यासाठी वस्त्र देण्यात आले व त्यानंतर भुसावळ शहरात शिवसेनेच्या दहा शाखा प्रमुखांना व उपशाखा प्रमुखांना आणि शिवसैनिकांना शिवसेनेचे ओळखपत्र देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक तसेच नगरसेवक मुकेश गुंजाळ, अब्रार शेख, मनोहर बारसे, सुरज पाटील, नमा शर्मा, बाळू भोई, राकेश खरारे, हेमंत खंबायत, हेमंत बर्‍हाटे, मिलिंद कापडे, सोनी ठाकूर, अशोक जाधव, दिवाकर विसपुते, बाबूराव हिंगने, गौतम तायडे, राजू इंगळे, दिलीप शिंगारे, विजय महाजन, वाढोणकर, मयुर जाधव, मयुर सावकारे, पवन बागसे, लोकेश वारके, चेतन भोई, संजू भोई, पवन दोडे आदी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !