जळगाव तालुक्यातील तरुणीला पळवून नेत अत्याचार : एकाविरोधात गुन्हा
Jalgaon taluka girl abducted and tortured : Crime against one जळगाव : जळगाव तालुक्यातील एका गावातील 21 वर्षीय तरुणीला फूस लावून पळवनू नेत तिच्यावर 3 ते 6 जूनदरम्यान ठिकठिकाणी अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रात्री उशीरा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कुटूंबियांना मारण्याची धमकी देत अत्याचार
जळगाव तालुक्यातील एका गावात 21 वर्षीय तरुणी परीवारासह वास्तव्याला असून जळगाव शहरातील एका महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेते. तरूणीच्या चुलत भावाच्या लग्नात सागर सपकाळे या तरुणाशी ओळख झाल्यानंतर परीक्षा सुरू असतांना 3 जून रोजी तरुणी महाविद्यालयात गेल्यानंतर सागर सपकाळे याने दुचाकीवरून पेपर संपताच तिला दुचाकीवरून पळवून नेले तसेच तरुणीला इंदौर आणि प्रीतमपूर येथे लॉजवर नेवून अत्याचार करण्यात आला. यावेळी कुटूंबियांना ठार मारण्याची धमकीही आरोपीने दिली. हा प्रकार घडल्यानंतर पीडीत तरुणीने जळगावात येवून नातेवाईकांसोबत तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तरूणीच्या फिर्यादीवरून 19 जुलै रोजी रात्री उशीरा संशयित सागर सपकाळे विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास प्रभारी पोलीस उपअधीक्षक आप्पासाो. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनंत अहिरे करीत आहेत.


